शरद पवारांनी हाताने इशारा करुन वळसे-पाटलांना जवळ बोलावलं, सुरक्षारक्षकांना लिफ्टमधून बाहेर काढल

एनसीपी शरद पवार कॅम्प आणि अजित पवार कॅम्प: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज साताऱ्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी हजेरी लावली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार, संचालक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि शरद पवार यांच्या भगिनी सरोजताई पाटील यादेखील सातारा इथल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळामध्ये दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे देखील एक संचालक आहेत.

पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संस्थेची बैठक होत असते. कार्यक्रमापासून अगदी जवळच असलेल्या इमारतीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला शरद पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ चेअरमन यांच्या केबिनमध्ये चर्चा करत होते. त्यानंतर मुख्य बैठकीला जाण्यासाठी सर्वच बाहेर पडले. सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यादेखील पोहोचल्या,  सगळ्यात शेवटी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील चौथ्या मजल्याकडे जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने निघाले… शरद पवार त्यांच्यासह लिफ्टमध्ये दोन सुरक्षारक्षक होते. त्याचवेळी शरद पवार यांनी लिफ्टच्या बाहेर उभा असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना पाहिले. लिफ्ट थांबवली आणि शरद पवार यांनी सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्याचा इशारा केला…आणि त्याच वेळी हाताने इशारा करून दिलीप वळसे पाटील यांना लिफ्टमध्ये बोलावले. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील दोघे एकाच लिफ्टमधून बैठकीसाठी चौथ्या मजल्यावर पोहोचले.

Sharad Pawar in Satara: व्यासपीठावर पवार-वळसे पाटील एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत

व्यासपीठावर असताना शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकमेकांशी अजिबात संवाद साधला नाही. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील एकमेकांशी संवाद साधला नाही. सुप्रिया सुळे या शरद पवार आणि रोहित पवार यांच्याशी चर्चा करत होत्या तर अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा कालपासून सुरू झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांनी अजितदादा आणि शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास दोन्ही नेत्यांनी नकार दिला. तर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची मुलाखत मी वाचली नसल्याचे म्हटले. तर रोहित पवार यांनी देखील अशा कुठल्याही निर्णयाबाबत पक्षाची बैठक झाली नसल्याचे बोलून दाखवले.

https://www.youtube.com/watch?v=WCAS6GXDSY4

आणखी वाचा

आम्ही विचाराने एकच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवारांनी पत्ता टाकला!

अधिक पाहा..

Comments are closed.