Sharad Pawar’s advice to Ajitdada at the Cooperative Council program
आज (12 मे) पुन्हा एकदा सहकार परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मंचावर असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांच्या कानात गुफ्तगू केल्याने राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा आणखी बळावली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचा गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज (12 मे) पुन्हा एकदा सहकार परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मंचावर असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांच्या कानात गुफ्तगू केल्याने राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा आणखी बळावली आहे. (Sharad Pawar’s advice to Ajitdada at the Cooperative Council program)
अजित पवारांनी वेगळी राजकीय चूल मांडल्यानंतर कौटुंबिक कार्यक्रम वगळता शरद पवार यांनी अजित पवारांशी सार्वजनिकरित्या चर्चा करणे टाळले आहे. पण आज खुद्द पवारांनी अजित पवारांशी कानात केलेले गुफ्तगू सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. त्यावेळी दोघांचे हसतमुख फोटो बाहेर आले होते. त्यानंतर आज काका-पुतणे एकाच मंचावर आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.
मुख्यमंत्री उठून गेले अन् पवारांनी अजितदादांना बोलावलं
वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी राज्य सहकारी बँकेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम संपण्याआधी गडकरी आणि एकनाथ शिंदे निघून गेले. तसेच कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेल्यानंतर पवारांनी अजित पवारांना बोलवून कानात काही संदेश दिला. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष या दृश्याकडे वळले गेले.
विशेष अधिवेशनात संरक्षण क्षेत्राबद्दल किती चर्चा करणार- पवार
भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून विशेष अधिवेशनाची मागणी होते आहे. पण विशेष अधिवेशन बोलावण्यापेक्षा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून चर्चा करणे अधिक योग्य ठरेल. यामुळे काश्मीर प्रश्नावर पारदर्शकता येईल, तसेच सर्व पक्षांना सरकारच्या भूमिकेची माहिती मिळेल. कारण काश्मीर प्रश्न हा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांचाच भाग नाही, तर तो राष्ट्रीय एकतेचा आणि सुरक्षेचा मुद्दा आहे. या विषयावर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय एकमत निर्माण केले जावे. यामुळे काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका अधिक मजबूत होईल. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दृष्टिकोन स्पष्ट होईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
हेही वाचा – Bacchu Kadu : नेहमीचं दुखणं बंद करण्यासाठी पाकिस्तान भारतात घ्या; बच्चू कडूंचे वक्तव्य चर्चेत
Comments are closed.