Sharad Pawar’s statement about the two nationalist parties coming together is under discussion


गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

मुंबई : दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी बंडखोरी करत आपले काका म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. मात्र मागील महिन्यात अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी तब्बल तीनवेळा एकत्र आली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. (Sharad Pawar’s statement about the two nationalist parties coming together is under discussion)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र येणार का? किंवा तुमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत तुमचं मत काय? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर शरद पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, सध्या आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. त्यातला एक मतप्रवाह सांगतो की, आम्ही म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यायला हवं. तर दुसरा मतप्रवाह सांगतो की, कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाता कामा नये. तसेच इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट पुन्हा एकदा बांधावी असे मत दुसऱ्या गटाचे असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मराठी : ठाण्यात शिंदेंची खेळी अन् शरद पवारांना दणका, 6 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

इंडिया आघाडीच्या सध्याच्या परिस्थितीवर पवारांकडून भाष्य

शरद पवार यांना इंडिया आघाडीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटले की, आम्ही आधीपासून इंडिया आघाडीत असलो, तरी सध्या इंडिया आघाडी शांत आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करावं लागेल आणि आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. यासाठी तरुणांना पक्षात सामील करून घ्यावे लागेल आणि त्यानंतर एकत्र मिळून काम करावे लागेल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

हेही वाचा – OPERATION SINDOOR : ऑपरेशन सिंदूरमध्ये पुणे कनेक्शन; तिन्ही दलांचे प्रमुख आहेत बॅचमेट



Source link

Comments are closed.