Sharad Pawar’s statement that Sanjay Raut always writes about corruption in the government system


शासकीय यंत्रणेत जिथे भ्रष्टाचार आहे. त्याविरोधात संजय राऊत नेहमी लिहितात, असे वक्तव्य शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाश सोहळ्यावेळी केले.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचा आज (17 मे) प्रकाश सोहळा पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, शासकीय यंत्रणेत जिथे भ्रष्टाचार आहे. त्याविरोधात संजय राऊत नेहमी लिहितात. (Sharad Pawar’s statement that Sanjay Raut always writes about corruption in the government system)

कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, लक्षात राहणारा असा हा आजचा कार्यक्रम आहे. कारण संजय राऊत यांनी 100 दिवस तुरुंगात घालवले आणि तिथले सर्व अनुभव लिखित स्वरुपात आपल्यासमोर मांडले आहे. कुणी गुन्हा केला असेल, केस झाली असेल किंवा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांवर येत असतं. पण संजय राऊत यांनी काय केलं होतं? संजय राऊत यांनी नियमित रोखठोक भूमिका मांडली. पण ही बाब काही लोकांना मान्य नव्हती. त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती आणि ते सर्व लोक अस्वस्थ होते. बहुतेक संधीची वाटच पाहत होते. त्यांना पत्राचाळ प्रकरणाने संधी दिली. पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. कारण ईडीने जी केस केली आणि त्यात राऊत यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांना गुंतवण्याचं काम काही लोकांनी केलं. जिथे अन्याय होतो किंवा अत्याचार होतो, त्या विरोधात सामना उभा राहतो. हे अखंडपणे काम सुरू होतं, असे म्हणत शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर भाष्ट केलं.

हेही वाचा – Sanjay Raut : जे लिहिलंय ते सत्य; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेबांचे नाव घेऊन राऊत काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, शासकीय यंत्रणेत जिथे भ्रष्टाचार आहे. त्याविरोधात ते (संजय राऊत) नेहमी लिहितात. मुंबई आणि महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करतात, हे माहीत असताना त्यांसंबंधीची कारवाई होत नव्हती. त्यामुळे खासदार म्हणून संजय राऊतांनी देशाच्या प्रमुखांना याबाबतचं पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात, याचं सविस्तर लिखाण त्यांनी (संजय राऊत) केंद्राला कळवलं. त्यात जवळपास 30 ते 35 लोकं आणि कंपन्या अशा होत्या की, ज्यांच्याकडून पैसे काढले गेले. ही रक्कम जवळपास 58 कोटींच्या आसपास होती. ही माहिती राऊत यांच्याकडे आल्यावर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात ती पाठवून दिली होती. पण कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप पवार यांनी यावेळी केला.

पुस्तकामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचे बळ मिळेल

शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांना 100 दिवस तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं पुस्तक वाचल्यावर तिथली स्थिती काय आहे, हे आम्हाला कळेल. तसेच ही स्थिती दुरुस्त करण्याचा प्रयोग करावा लागेल. त्यांच्या जेलमधील आठवणी आणि अनेकांच्या भेटीगाठी लक्षात येणार आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई इंग्लंडमध्ये होते. खडसेंविरोधात काही तक्रार आल्याने त्यांचे जावई लंडन सोडून इथे आले. इथे आल्यानंतर ईडीने त्यांना कोणताही संबंध नसताना अटक केली. अनिल देशमुख यांना देखील अटक झाली. पण ही सगळी मंडळी त्रास होऊनही नमली नाहीत. एकत्र राहिली, एकमेकांना धीर दिला. खरंतर ईडीची यंत्रणा कशी वागते याचे उत्तम लिखाण या पुस्तकात आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद येणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकशाहीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि लोकप्रतिनिधींना यातून माहीती मिळेल. सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचे त्यांना बळ मिळेल. तसेच न्याय व्यवस्था ही आदर्श असायला हवी, ती ईडीच्या हातातील बटीक व्हायला नको. याचा धडा संजय राऊत यांच्या पुस्तकातून यातून मिळेल, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : आपल्या वाडवडीलांनी कोणावर केलेले उपकार…; अमित शहांबद्दल ठाकरे काय म्हणाले?



Source link

Comments are closed.