Share Market News – शेअर बाजारात CAS चा खेळ सुरुच; शेवटच्या 15 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशातील जीडीपीच्या चांगल्या आलेल्या आकडेवारीमुळे शेअर बाजाराला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. बाजार सुरू होताच त्यात तेजीही दिसून आली. सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात, सेन्सेक्स ७७,००० अंकांच्या अगदी जवळ पोहोचला आणि त्यात ३५० हून अधिक अंकांची वाढही झाली. मात्र, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या CAS मुळे गुरुवारी बाजारात शेवटच्या 15 मिनिटात मोठा उलटफेर झाला आणि गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान झाले.

बीएसईच्या एक्स्पायरीमुळे सेन्सेक्समध्ये शेवटच्या तासाभरात लक्षणीय घसरण झाली. शेअर बाजार बंद होण्याच्या १५ मिनिटे आधी म्हणजेच CAS सत्रादरम्यान घसरण सुरू झाली आणि ती वेगाने होत बाजारत 417 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून ७७० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना शेवटच्या 15 मिनिटांत अंदाजे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

तेलाच्या वाढलेल्या किमती, बॉण्डवरील परतावा (यील्ड) आणि इतर घटकांमुळे बाजारात नकारात्मकता आली. त्यामुळे सकाळच्या सत्रात आलेली तेजी बाजार बंद होईपर्यंत मंदीत रुपांतरीत झाली होती. बीएसई एक्स्पायरीच्या दिवशी क्लोजिंग ऑक्शन सेशननंतर (CAS) सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. तो ४१७ अंकांनी, म्हणजेच अंदाजे ०.६% ने घसरून ७६,१५३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५०. ४१ अंकांनी, म्हणजेच ०.१७% ने घसरून २३,८७३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने सकाळी सुमारे ९:४५ वाजता ७६,९२४.४८ अंकांचा इंट्राडे उच्चांक गाठला होता. तिथून सेन्सेक्स ७७१.६२ अंकांनी घसरून बंद झाला. तर निफ्टी आपल्या उच्चांकावरून सुमारे १५२ अंकांनी घसरून बंद झाला.

Comments are closed.