Share Market News – सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला, निफ्टीनेही घेतली 250 अंकांची झेप; बाजारातील तेजीचं कारण काय?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून जगभरातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. हिंदुस्थानच्या शेअर मार्केटवरही या युद्धाचे परिणाम दिसले. सोमवारी शेअर बाजारमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. मंगळवारीही बाजार दबावात राहील अशी शक्यता होती. मात्र जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घट यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या सत्रामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 809 अकांनी उसळून 78,375.73 वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 252 अकांची झेप घेऊन 24,280.80 वर पोहोचला.
बातमी अपड़ेट होत आहे…
Comments are closed.