Share Market News- अमेरिकेच्या शेअर बाजारातील भूकंपाचा हिंदुस्थानलाही फटका; सेन्सेक्स, निफ्टी भूईसपाट

अमेरिकेच्या शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम हिंदुस्थानातील शेअर बाजारावरही दिसून येत आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वॉर दरम्यान मंगळवारी बाजाराला सुरुवात होताच मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात कोसळले. अमेरिकेच्या शेअर बाजारातील वादळाचा फटका हिंदुस्थानलाही बसला आहे.

अमेरिकेच्या शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे. सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. डाऊ जोन्स ८२१ अंकांनी घसरून बंद झाला. त्यामुळे जागतिक आणि आशियाई बाजारातून नकारात्मक संकेत येत आहे. त्याचा परिणाम मंगळवारी बाजार सुरू होताच दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीचे व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 700 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.तर निफ्टी 25,600 च्या खाली घसरला. सर्वात जास्त घसरण झालेल्या शेअर्समध्ये, बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका टेक स्टॉक्सना बसला, ज्यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल आणि टेक महिंद्रा सारखे शेअर्स कोसळले.

मंगळवार शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी तीव्र घसरणीसह उघडले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअर्सचा सेन्सेक्स ८३,०५२ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८३,२९४.६६ पेक्षा कमी होता. तथापि, काही मिनिटांतच, सेन्सेक्स जवळजवळ ७१७ अंकांनी घसरून ८३,५७७ वर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक देखील सेन्सेक्सच्या बरोबरीने घसरत असल्याचे दिसून आले. निफ्टी-५० त्याच्या मागील बंद २५,७१३ पेक्षा कमी होऊन २५,६४१ वर व्यवहार करत होता. त्यानंतर, अचानक तीव्र घसरण सुरू झाली, २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून २५,५०७ वर पोहोचला.

बाजारातील ही घसरण सुरुच होती. दुपारी 1 वाजताच्या सुमारास निफ्टी 291.65 अंकांनी म्हणजेच 1.13% घसरुन 25,421 . 75 वर व्यवहार करत होता. तर बँक निफ्टी 219.80 अंकांनी म्हणजेच 0.36% घसरुन 61,034 . 75 वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स -1029.48 अंकांनी म्हणजेच 1.24 % घसरून 82,268.76 वर व्यवहार करत होता.

शेअर बाजारातील या अचानक झालेल्या तीव्र घसरणीत आयटी शेअर पत्त्यांच्या घरासारखे कोसळले. शेअर्स एचसीएल टेक शेअर (४%), इटरनल शेअर (३.९०%), इन्फोसिस शेअर (३.५०%), टेक महिंद्रा शेअर (३.२०%), टीसीएस शेअर (३.१०%) आणि भारती एअरटेल शेअर (३.०५%) यांचा समावेश आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सेन्सेक्स आणि निफ्टीसारखे कोसळले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जगभरात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कठोर भूमिकेमुळे अमेरिकन शेअर बाजार हादरलेला दिसत होता. सोमवारी अमेरिकन बाजारात झालेल्या घसरणीनंतर, मंगळवारी हिंदुस्थानला नकारात्मक संकेत मिळत होते. जपानचा निक्केई निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यापार करत असताना, हाँगकाँगचा हँग सेंग, जर्मनी आणि यूकेचा बाजार लाल रंगात व्यापार करत होता.

अमेरिकेच्या टॅरिफमुळे वाढलेल्या जागतिक तणावासह जागतिक पातळीवर खराब संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव निर्माण झाला आहे. तथापि, भारतीय शेअर बाजारातील या अचानक झालेल्या घसरणीमागे देशांतर्गत आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री हे देखील एक प्रमुख कारण मानले जाऊ शकते, कारण बाजारातील घसरणीदरम्यान आयटी शेअर्स सर्वात जास्त कोसळले आहेत.

Comments are closed.