सलग दोन दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक, सेन्सेक्स मध्ये 443 अंकांची तेजी, ‘या’ शेअरमध्ये जोरदार तेजी
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारातील घसरणीचं सत्र थांबलं. आज बीएसई सेन्सेक्स 443 अंकांनी वाढून 82200.34 अंकांवर पोहोचला. तर, निफ्टी 50 निर्देशांक देखील 122.30 अंकांनी वाढून 25090.70 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

शुक्रवारी निफ्टी 50 एका महिन्याच्या निचांकावर पोहोचला होता. निफ्टी 50 निर्देशांक 25 हजारांच्या खाली आला होता. आशियाई बाजाराची मजबुती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानं बाजार सावरला.

पूर्वीचे झोमॅटो आणि आताचे इटरनल यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर याच्या शेअरमध्ये 5.38 तेजी पाहायला मिळाली. आयसीआयसीआय बँकेचा शेअर 2.76 टक्क्यांनी वाढला. जूनच्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 13558 कोटी रुपे झाला आहे.

HDFC बँकेचा शेअर 2.19 टक्क्यांनी वाढला. एचडीएफसी बँकेची कमाई पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घसरला आहे. मात्र, शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

बाजारमूल्याच्या नुसार सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये 3.29 टक्क्यांची घसरण झाली. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीला 26994 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी, हिन्दुस्तान यूनिलीवर आणि एचसीएलच्या शेअरमध्ये घसरण झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित: 21 जुलै 2025 07:48 पंतप्रधान (आयएसटी)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.