Share Market Update – तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीनं मार्केटमध्ये हाहाकार; सेन्सेक्स 1700, निफ्टी 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धाचा परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावरही होत आहे. हे युद्ध बराच काळ चालण्याचा अंदाज वर्तवला जात असून जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे शेअर बाजारात तुफान विक्री सुरू आहे. बुधवारी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-20 मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारांना लाखो कोटींचा फटका बसला आहे.
Comments are closed.