मरो त्याचे दुश्मन…, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा संतापले

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर धर्मेंद्रचे जवळचे मित्र अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले आहेत. ते म्हणाले विश्वासू पोर्टल्सवर बातम्या पाहून त्यांनाही निधनाची बातमी खरी वाटली. मात्र, नंतर त्यांना निधनाची बातमी खोटी असल्याचे कळले.
बॉलीवूड हंगामाशी बातचीत करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ”मी सकाळी उठल्यावर बातम्या पाहिल्या आणि खरे वाटले. कारण विश्वासू पोर्टस्स आणि पब्लिकेशन्सवर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या दाखवण्यात आल्या. पण काही क्षणात काहीसा दिलासा मिळाला. कारण या बातम्या खोट्या होत्या. धरमजी ठीक आहेत आणि लवकरच ते घरी असतील. मरो त्यांचे दुश्मन, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शत्रुघ्न पुढे म्हणाले, जे अशाप्रकारच्या बातम्या पसरवत आहेत, ते आहेत तरी कोण? धरमजी यांच्याकडे कोणतीही टीम नाही. मग कोणत्या टीमकडून या बातमीला दुजोरा मिळाला आहे? हे अजिबात बरोबर नाही. शत्रुघ्न सिन्हा आणि धर्मेंद्र पाच दशकांपासून एकमेकांचे मित्र आहेत. शत्रुघ्न सांगतात, ”धर्मेंद्र आणि हेमा मला खूप आवडतात. आम्ही तिघांनीही आमच्या सर्वोत्तम सिनेमापैकी गुलाल गुहा यांच्या ‘दोस्त’ सिनेमात एकत्र काम केले आहे. आम्हाला तिघांना जितके भेटायला हवे होते तितके भेटता येत नाही. मात्र, जेव्हा भेटतो तेव्हा खूप गप्पा मारतो, खातो-पितो आणि संगीत ऐकतो” असेही ते म्हणाले.
देओल यांची तिसरी पिढी सिनेसृष्टीत आली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,”माझा मित्र निरोगी आयुष्य जगो अशी मी प्रार्थना करतो. त्याच्याकडे अभिमान बाळगण्यासारखे बरेच काही आहे. आता तर त्यांची नातवंडे देखील अभिनेते झाले आहेत. देओल कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ही काही छोटी कामगिरी नाही.”

Comments are closed.