माजी पंतप्रधान हसीना यांची युनुस यांच्यावर टीका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनुस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आवामी लीगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेख हसीना यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, 1971 ची ती भयानक रात्र आठवली. त्या रात्री पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सर्चलाईट सुरू केले होते. या ऑपरेशनचा उद्देश बंगाली समाजाचे अस्तित्व मिटवणे हा होता. अवघ्या 9 महिन्यांत 30 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. मोहम्मद युनुस यांच्या सरकारने युद्धातील गुन्हेगारांना सोडले. तसेच एका गुन्हेगाराला चक्क खासदार बनवले, हा लाखो शहीदांचा अवमान आहे, असे त्या म्हणाल्या.
Comments are closed.