'शेषनाग-150' रॉकेटच्या साहाय्याने उडणार
धावपट्टीशिवाय 1 हजार किमीवरील लक्ष्य भेदणार : 5 तासांहून अधिक काळ हवेत राहू शकणार
वृत्तसंस्था, बेंगळूर
भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानात आणखी एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. बेंगळूर येथील न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज या कंपनीने विकसित केलेल्या शेषनाग-150’ या लांब पल्ल्याच्या लढाऊ ड्रोनची रॉकेट सहाय्यित उ•ाण चाचणी यशस्वी ठरली आहे. या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक धावपट्टीची आवश्यकता न पडता मर्यादित जागेतूनही ड्रोनचे उ•ाण शक्य होऊ शकते.
लॉइटरिंग म्युनिशनमुळे हा ड्रोन टार्गेट एरियात घिरट्या घालत राहतो, स्थितीचे आकलन करतो, मग हल्ला करतो. रॉकेट असिस्टेड टेकऑफ सिस्टीम या ड्रोनला छोट्या स्थानांवरूनही लाँच करण्याची सुविधा देतो. यामुळे सैनिकांना तयार धावपट्टीची गरज भासत नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याला भारतीय डीप अटॅक क्षमतांसाठी नवा अध्याय ठरविले आहे.
पोखरणमध्ये 720 किमीची चाचणी
यापूर्वी शेषनाग-150 ड्रोनने पोखरण येथे सुमारे 720 किलोमीटरचे उ•ाण परीक्षण केले होते. आता रॉकेट-सहाय्यित उ•ाण चाचणीमुळे त्याच्या तैनातीच्या पर्यायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची प्रगती
आधुनिक युद्धात लांब पल्ल्याचे ड्रोन, स्वयंचलित लक्ष्यनियंत्रण आणि समुहाने हल्ला करण्याची क्षमता यांना महत्त्व प्राप्त होतेय. अशा स्वदेशी प्रणालींमुळे भारताची संरक्षण उत्पादनातील स्वावलंबनाची दिशा बळकट होऊ शकते. मात्र, शेषनाग-150 चा प्रत्यक्ष लष्करी वापर आणि अंतिम कार्यक्षमतेबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.
शेषनाग-150 ची वैशिष्ट्यो….
? 1000 किमीपेक्षा अधिक पल्ला : या लढाऊ ड्रोनची संभाव्य मारक क्षमता 1,000 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
? पाच तासांहून अधिक उ•ाण : दीर्घकाळ हवेत राहून लक्ष्य क्षेत्रावर नजर ठेवण्याची या आधुनिक ड्रोनमध्ये क्षमता.
? 150 किलो वजन : शेषनाग-150 हा लढाऊ ड्रोन 150 किलो वजनाच्या श्रेणीत विकसित करण्यात आलेला ड्रोन आहे.
? 25-40 किलो वजनाचे वॉरहेड : या ड्रोनमध्ये या वजनाच्या श्रेणीतील स्फोटक वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे.
? धावपट्टीशिवाय उ•ाण : रॉकेट-सहाय्यित प्रणालीमुळे तयार धावपट्टीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते.
? समुहाने कारवाईची क्षमता : अनेक ड्रोन एकत्रितपणे कार्यरत राहण्याच्या तंत्रज्ञानासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा.
Comments are closed.