Shetkari Karjmafi : Govt’s new date for loan waiver; New update from Agriculture Minister Bharan

शेतकरी कर्जमाफी : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांना ही खुशखबर दिली. यापूर्वी 5 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे सांगण्यात आले होते, मात्र 16 जूननंतरही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असतानाच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची नवी तारीख जाहीर केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी केली जाणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.दत्तात्रय भरणे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांमुळे कर्जमाफीची प्रक्रिया लांबली आहे. शेतकरी कर्जमाफी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली आहे. त्या संदर्भात आवश्यक परवानगी घेण्यात आली असून लवकरच लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची रक्कम 30 जुलै किंवा त्यापूर्वी वितरित केली जाईल, अशी माहिती दिली. शेतकरी कर्जमाफी

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दोन महत्त्वाच्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत. पहिली अट म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 च्या लाभार्थींचे 50,000 रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने 2026-27 मध्ये नियमित कर्ज परतफेडीची अटही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Comments are closed.