डोक्यावर अक्षता पडल्या, गळ्यात हार घालताच शिखर धवनचं पत्नीसोबत स्टेजवर लिपलॉक, लग्नातील Unseen
शिखर धवन विवाह : भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करत विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची दीर्घकाळची गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबत दुसरे लग्न करत नवा संसार थाटला आहे. ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा धवन या नव्या सुरुवातीमुळे खुपच आनंदात असल्याचे दिसून येत आहे.
गळ्यात हार घालताच शिखर धवनचं पत्नीसोबत स्टेजवर लिपलॉक
लग्नसमारंभातील काही अनोखे आणि आतापर्यंत न पाहिलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषतः वरमाला सोहळ्याची झलक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये प्रथम धवन नम्रपणे डोके झुकवताना दिसतो आणि त्यानंतर सोफी त्याच्या गळ्यात वरमाला घालते. पुढे धवनही आपल्या जीवनसाथीच्या गळ्यात हार घालतो. विधी पूर्ण होताच दोघांचाही आनंद ओसंडून वाहताना दिसतो, स्टेजवरच त्यांनी एकमेकांना मिठी मारत प्रेम व्यक्त केले.
या नवदांपत्याची केमिस्ट्री चाहत्यांना अक्षरशः भुरळ घालत आहे. धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नसोहळ्यातील काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. एका छायाचित्रात तो सोफीच्या कपाळावर सिंदूर भरताना दिसतो, तर दुसऱ्यात दोघेही आनंदाने जल्लोष करताना दिसतात. आणखी एका फोटोमध्ये मोठ्या हास्यासह दोघेही लग्नसोहळ्याचा आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल झाले असून, चाहत्यांसह क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
धवन आणि सोफी यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी एकमेकांवरील प्रेम जाहीर केले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान दुबईमध्ये दोघे प्रथम एकत्र दिसले होते. मे 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याची घोषणा करून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट केले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी, 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
आयशा मुखर्जीसोबत झाला घटस्फोट…
धवनचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी 2011 मध्ये त्याने स्वतःपेक्षा दहा वर्षांनी मोठ्या ऑस्ट्रेलियन नागरिक आयशा मुखर्जी यांच्याशी विवाह केला होता. मात्र हे नाते सुमारे 11 वर्षांनंतर तुटले आणि ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. धवन आणि आयशा यांना जोरावर नावाचा मुलगा असून तो सध्या आईसोबत राहतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.