VIDEO: शिखर धवनला पुन्हा लग्न करायचंय, पण वडील महेंद्र पाल धवन यांनी आपल्या मुलाचं मन मोडलं.
दिल्ली: गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. यावेळी धवन त्याच्या खेळामुळे नाही तर दुसऱ्या लग्नाच्या इच्छेमुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने त्याचे वडील महेंद्र पाल धवन यांच्यासोबत एक मजेदार रील शेअर केली, ज्यामध्ये त्याने दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले.
रीलमध्ये, धवन त्याच्या वडिलांना सांगतो, “पपा, मला पुन्हा लग्न करायचे आहे.” यावर त्याचे वडील गमतीने उत्तर देतात, “मी तुझे पहिले लग्न हेल्मेट घालून केले होते.” हे ऐकून धवनचा चेहरा पाहण्यासारखा होतो. एवढेच नाही तर त्याचा पाळीव कुत्राही विचित्र प्रतिक्रिया दाखवतो.
शिखरने पहिले लग्न 2012 मध्ये आयशा मुखर्जीशी केले होते, जी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. आयशा ही ऑस्ट्रेलियातील मेलबर्नची रहिवासी असून ती मूळची ब्रिटिश-बंगाली आहे. लग्नापूर्वी आयेशाचा घटस्फोट झाला होता आणि तिला दोन मुले होती. दोघांनाही जोरावर हा मुलगा असून तो आपल्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. 2023 मध्ये धवन आणि आयशा यांचा घटस्फोट झाला.
धवन त्याचा मुलगा जोरावरला खूप मिस करतो आणि अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. निवृत्तीनंतर, धवन नेपाळ प्रीमियर लीग (NPL) मध्ये खेळताना दिसला, जिथे त्याने कर्नाली याक्स संघासाठी चमकदार कामगिरी केली. या लीगमध्ये खेळणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला.
३८ वर्षीय धवन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. चाहत्यांना त्याचे रील खूप आवडतात. मात्र, आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार नसल्याचेही धवनने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या
Comments are closed.