60 कोटींचा फसवणूक खटला रद्द करा; शिल्पा शेट्टी, राज कुंद्राची हायकोर्टात धाव

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज पुंद्रा यांने हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेत तक्रारदार दीपक कोठारी यांना याचिकेची प्रत देण्याचे आदेश दिले व सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहपूब ठेवली.

व्यापारी दीपक कोठारी यांनी 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज पुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. कोठारी यांना बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीत 60 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. मात्र त्यांनी या निधीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिल्पा शेट्टी व पुंद्राविरोधात जुहू पोलीस ठाण्यात लूकआउट नोटीस जारी केली. या लूकआउट नोटीसला स्थगिती मिळावी म्हणून दोघांनी याचिका दाखल केली. मात्र हायकोर्टाने त्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी खटला रद्द करावा, अशी मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने याचिकेच्या प्रती तक्रारदार दीपक कोठारी यांना देण्याचे आदेश देत सुनावणी तहपूब केली.

Comments are closed.