Ratnagiri News – शिंदे गटाची बंडखोरीची फक्त हवा! जुईली महेंद्र दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूकीत रायगड -रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघात शिंदे गटाच्या बंडखोरीचा बार फुसका ठरला असून आता सेटलमेंटची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाच्या अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
शिंदे गटाच्या अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी 30 मे रोजी 1 अर्ज दाखल केले होता. त्यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात टिका केली होती. मात्र हे बंड तीन दिवसात शमले. शिंदे गटाची बंडखोरीची फक्त हवा ठरली. शिंदे गटाने माघार नक्की कोणत्या मुद्द्यावर घेतली याबाबत आता राजकीय वर्तुळात सेटलमेंटच्या चर्चा रंगत आहेत.
Comments are closed.