Shinde shivsena mla balaji kinikar Conspiracy to murder ambernath police arrested two people-ssa97


Balaji Kinikar : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतील आमदाराच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील एका समारंभात आमदाराची हत्येचा कट रचला होता. पण, आमदारानं याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, शिवसेनेतील दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. याच गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

– Advertisement –

हेही वाचा : खेळत असताना दोन चिमुरड्या झालेल्या गायब, पण..; पुण्यात समोर आली थरकाप उडविणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वत: आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

– Advertisement –

याची गंभीरतेने दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या 2 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

याप्रकरणी आमदार किणीकर आणि पोलिसांनी अधिकृतपणे माहिती दिली नाही. तसेच, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा : काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘EVM’वर संशय, पण सुळेंनी मांडली मित्रपक्षांच्या विरोधात भूमिका



Source link

Comments are closed.