साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, ग्रामस्थांकडून कठोर आचारस
शिर्डी क्राइम न्यूज: अवघ्या जगाला श्रद्धांजली आठ दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाने मोठे खळबळ उडाली होती. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आता प्रशासनासह ग्रामस्थ देखील पुढे आले असून साईबाबाच्या दर्शनाला जाणाऱ्या शिर्डीतील भाविकांसह व्यवसायिकांसाठी मोठी बातमी आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच कठोर पाऊल उचलले असून आचारसंहिता लागू केली आहे. शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आता शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी पाच पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन देखील करण्यात येणार आहे. (Shirdi Crime)
दरम्यान शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सव आहे. हजारोंच्या संख्येने भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी होणार आहेत. साई नामाचा जयघोष, पारंपरिक वाद्यांच्या तालात परिक्रमेस सुरुवात झाली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या आचारसंहिताची शिर्डीत एकच चर्चा आहे.
दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामस्थ आक्रमक
आठ दिवसांपूर्वी लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ल्यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती. यानंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली. दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने ही पावले उचलत अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केली आहे. या पाठोपाठ आता शिर्डी ग्रामस्थ देखील याबाबत आक्रमक झाल्या असून ग्रामसभा घेत शिर्डीतील व्यवसायिकांसाठी आचारसंहिता बनवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेनंतर माजी खासदार सुजय विखे व ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन सात कलमी आचारसंहिता बनवण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे यांनी दिली. शिर्डीतील सर्व आस्थापना रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय बाहेरून आलेल्या व्यवसायिकांची चौकशी करण्यात येणार आहे. लवकरच शिर्डीत डोर टूडोर व्हेरिफिकेशन देखील करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सुजय विखे आणि ग्रामस्थांच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय?
1) शिर्डीतील सर्व आस्थापना रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत बंद राहणार…
2) शिर्डी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरातील ट्रस्ट एकत्र करून शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापन करणार…यात खंडोबा मंदिर, हाजी अब्दुलबाबा समाधी, लक्ष्मीआई मंदिर, मारुती मंदिर, शनी व गणेश मंदिर यासह इतर मंदिरे यांचे खाजगी ट्रस्ट बरखास्त करुन शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या नियंत्रणाखाली आणणार..
3) शिर्डीत बाहेरुन येणा-या व्यावसायिकांची चौकशी करून होणार कारवाई.. .स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीवरुन घेण्यात आला निर्णय…
4) शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीच डोर-टू-डोर व्हेरीफिकेशन केल जाणार .. यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आऊटसोर्स पद्धतीन काम देत बाहेरील व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार..
5) शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय करणा-यावर कठोर करवाई करण्यात येणार…
6) गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचा-यांच एक पथक शिर्डीत तैनात ठेवण्याची मागणी…
7) अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना पर्यायी जागा देवून देखिल अतिक्रमण काढत नसेल तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई होणार..
हेही वाचा:
Shirdi : शिर्डी संस्थानच्या जेवणासाठी आता कूपन आवश्यक, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अधिक पाहा..
Comments are closed.