शिर्डी हत्याकांडात मोठी अपडेट, 36 तासांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दुसरा आरोपी ताब्यात
शिर्डी गुन्हेगारी अद्यतनः तासाभराच्या अंतरात साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकत संपवल्याच्या दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डीसह संपूर्ण राज्य हादरले आहे . या प्रकरणात एका आरोपीस अटक केल्यानंतर आता शिर्डी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली . (Shirdi police)शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाख्या माळी नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे .विशेष म्हणजे या आरोपीने पोलिसांसमोर दारूच्या नशेत खून केल्याची कबुलीही दिल्याची माहिती अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांनी माध्यमांना दिली .(Shirdi Murder Case)
नक्की प्रकरण काय ?
शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे ( 3 फेब्रुवारी ) पहाटे ड्युटीला जाताना साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकत संपवण्यात आले . या हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच ठार झाले .तर एका तरुणावरही हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी आहे . शिर्डीमध्ये पहाटे तासाभराच्या अंतरात दोन कर्मचाऱ्यांना चाकू भोसकत ठार केल्याने मोठी खळबळ उडाली होती . दरम्यान, सोमवारीच या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली होती .आता दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या शिर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .तब्बल 36 तासांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या आरोपीला शिर्डी शहरातील काटवणातून ताब्यात घेण्यात आलं आहे .विशेष म्हणजे दारूच्या नशेत हा खून केल्याची कबुली दुसऱ्या आरोपीने पोलिसांना दिली आहे .शिर्डी शहरातून हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत .
दुहेरी हत्याकांड नशेखोरांचेच काम असल्याचा संशय
शिर्डीतील पहाटे घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली होती .कुटुंबाच्या आक्रोशामुळे शिर्डीत तणावाचे वातावरण होते .घटनेची माहिती कळूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप मृतांचे कुटुंबीय करत होते .दोन जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले असून तिसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा सांगण्यात आलं .ही प्रकरणे प्लॅन केलेली हत्या नसून नशेच्या आहारी गेलेल्या गुन्ह्यागारांकडून करण्यात आलेला खून असल्याचं खासदार सुजय विखे यांनीही सांगितलं होतं .त्यानंतर दुसऱ्या आरोपीला आज ( 5 फेब्रुवारी) शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला असून या आरोपीने दारूच्या नशेत हत्या केल्याचे कबूल केले आहे .घटनेचा अधिक तपास सुरू आहे .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.