भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात
नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. शिर्डी पोलिसांनी सोमवारी त्याला तेथील गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी 18 मार्चला अटक केली. महिला अत्याचार व आर्थिक फसवणूक प्रकरणी तो आतापर्यंत विशेष तपास पथकाच्या ताब्यात होता. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. शिर्डी पोलीस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध भूखंड हडपण्याचा गुन्हा दाखल आहे. शिर्डी पोलिसांचे पथक सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याचा ताबा घेतल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले. जमीन हडपण्याच्या गुन्ह्याबरोबरच खरातने तेथेही अनेक घोटाळे केले आहेत. समता पतसंस्थेत सुमारे शंभर बनावट खाते उघडून कोटय़वधी रुपयांची हेराफेरी केली आहे, त्याचीही चौकशी होणार आहे.
Comments are closed.