Shirdi sai baba devotees locals enforce code of conduct 7 step action plan to curb crime
दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शिर्डीनगरी हादरली असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. या शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता शिर्डीतील ग्रामस्थांनीही गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून पुढाकार घेतला आहे. शिर्डीत ग्रामस्थांकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
शिर्डी : दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शिर्डीनगरी हादरली असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. या शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता शिर्डीतील ग्रामस्थांनीही गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून पुढाकार घेतला आहे. शिर्डीत ग्रामस्थांकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामस्थांनी शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (shirdi sai baba devotees locals enforce code of conduct 7 step action plan to curb crime)
शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थ आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे सात कलमी आचारसंहिता बनवण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे यांनी दिली. शिर्डीतील सर्व आस्थापना रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बाहेरून आलेल्या व्यवसायिकांची चौकशी करण्यात येणार आहे. लवकरच शिर्डीत डोर टूडोर व्हेरिफिकेशन देखील करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
आठ दिवसांपूर्वी लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ल्यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने ही पावले उचलत अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केली आहे. या पाठोपाठ आता शिर्डी ग्रामस्थ देखील याबाबत आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत शिर्डीतील व्यवसायिकांसाठी आचारसंहिता बनवली आहे.
सुजय विखे आणि ग्रामस्थांच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते?
- शिर्डीतील आस्थापनं रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार
- शिर्डी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरातील ट्रस्ट एकत्र करून शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापन करणार असून, खंडोबा मंदिर, हाजी अब्दुलबाबा समाधी, लक्ष्मीआई मंदिर, मारुती मंदिर, शनी व गणेश मंदिर यासह इतर मंदिरं यांचे खाजगी ट्रस्ट बरखास्त करुन शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या नियंत्रणाखाली आणणार
- शिर्डीत बाहेरुन येणाऱ्या व्यावसायिकांची चौकशी करून कारवाई होणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीवरुन हा निर्णय घेण्यात आला
- शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीचं डोर-टू-डोर व्हेरिफिकेशन केल जाणार, यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आऊटसोर्स पद्धतीन काम देत बाहेरील व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार
- शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कठोर करवाई करण्यात येणार
- गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचाऱ्यांच एक पथक शिर्डीत तैनात ठेवण्याची मागणी
- अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना पर्यायी जागा देवून देखिल अतिक्रमण काढत नसेल तर त्यांच्यावर सक्तीची कारवाई होणार
हेही वाचा – Aaditya Thackeray : मविआत धुसफूस? दिल्लीत असूनही आदित्य ठाकरेंनी पवारांशी भेट टाळली
Comments are closed.