फक्त ही जमीन बिवलकरांच्या नावावर करण्यासाठी 25 दिवसांसाठी शिरसाटांना सिडकोचे चेअरमन केलं – संजय राऊत

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसाट यांनी संगनमताने सिडकोची पाच हजार एकर जमीन ही बिवलकर नावाच्या माणसाच्या नावावर केली असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. फक्त ही जमीन बिवलकरांच्या नावावर करण्यासाठी 25 दिवसांसाठी शिरसाटांना सिडकोचे चेअरमन केलं असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, वनखात्याची पाच हजार एकर जमीन जी बिवलकर नावाची व्यक्ती यांच्या नावावरसुद्धा नाही. या जमिनीवर सर्वोच्च न्यायालायाचाही स्टे आहे. अशी जमीन नगर विकास खात्याचे मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसाट यांनी संगनमताने ही जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली. सिडकोच्या अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही.

तसेच नवी मुंबई आणि रायगडमध्ये प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत नाहीयेत. या जमिनीची बाजारभावानुसार किंमत 50 हजार कोटी आहे. सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन बिवलकरला देण्यास जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त 25 दिवसासाठी आदेश काढण्यासाठी संजय शिरसाट यांना सिडकोच चेअरमन केलं. 25 दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही पाच हजार एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला, त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला. साधारण 50 हजार कोटीचा हा व्यवहार आहे. याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना 20 हजार कोटीचा मलिदा मिळालेला. आणि या लुटीतले दहा हजार कोटी बॉसला दिल्लीमध्ये आलेले आहेत.
एक खासदार पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो की याची चौकशी नाही तर एकनाथ शिंदे संजय, शिरसाट यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे. हे मनी लॉडरिंगच थेट प्रकरण आहे असेही संजय राऊत म्हणाले.

अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत, एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. महाराष्ट्रात काही झालं तरी अमित अमित शहांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत जातात. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले दहा हजार कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले आहेत असे संजय राऊत म्हणाले.

हे प्रकरण साधं नाहीये, महाराष्ट्राची ही लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन आणि संरक्षण मिळतंय. या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय हे पत्रात मी लिहिलेलं आहे. मी आजही सांगतोय, जर खुण्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयच करत असेल. माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का? माणिक कोकाटे गुन्हेगार आहे त्यांचं फक्त खातं बदललं. ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली. अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झाले आहेत. याचं कारण भ्रष्टाचारांना, घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ज्यांनी कारवाई करायची ते गृहखातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे. घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळतं. हा 50 हजार कोटीचा घोटाळा साधा नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंघल, तत्कालीन सिडकोचे एमडी डिगीकर. डिगीकरांना का बदली दिली. कारण त्यांनी याच्यावर सही करण्यास नकार दिला. विजय सिंघल यांनीसुद्धा सही करण्यास नकार दिला आणि सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करण्यास त्यांनी सांगितले. मग सिडकोच्या 25 दिवसासाठी संजय शिरसाट यांना अध्यक्षपदी आणलं आणि त्यांच्या माध्यमातून हा पाच हजार एकरचा भूखंड एकनाथ शिंदे संजय शिरसाट, यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला. या बिवलकरचा या भूखंडावरती अधिकारच नाही. मुंबई आणि रायगड मधले जमिनीचे आजचे भाव पाहता 50 हजार कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच केलेला नाही असे संजय राऊत म्हणाले.

मी अमित शहांना पत्र लिहून म्हटलंय की तुमच्यावरती आरोप होत आहेत. तुमच्यावरती बोट जातं आहे. तेव्हाही तुमची जबाबदारी आहे की या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतर्फ करा. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

Comments are closed.