निष्ठावंत शिवसैनिक हरपला, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची देखभाल करणारे संदीप पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची देखभाल करणारे निष्ठावंत शिवसैनिक संदीप पाटील (62) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले.

स्मृतिस्थळावर नित्यनेमाने पूजा करणारे आणि चाफा वाहणारे संदीप पाटील हे आप्पा म्हणून ओळखले जात. सामाजिक कार्याची आवड असलेले आप्पा नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असत. त्यांच्या जाण्याने सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि भाऊ-बहीण असा परिवार आहे.

संदीप पाटील हे दादर पश्चिम येथील शिवसेना क्रमांक 192 शाखेचे उपशाखाप्रमुख होते. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाच्या देखभालीची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. ती त्यांनी अखंडपणे पार पाडली. शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेत्या विशाखा राऊत, आमदार महेश सावंत, सचिव साईनाथ दुर्गे, मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार, यशवंत विचले, चंद्रकांत झगडे, दैनिक ‘सामना’चे दीपक शिंदे, विधानसभा संघटक आरती किनरे, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

निष्ठावंत शिवसैनिक संदीप पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शिवसेनाप्रमुखांप्रती असलेली त्यांची अढळ श्रद्धा, संघटनेप्रती निष्ठा आणि समर्पित कार्याची वृत्ती सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवाराने एक कर्तव्यदक्ष सहकारी गमावला आहे,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Comments are closed.