ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात शिवसेना-मनसेचा सोमवारी भव्य मोर्चा, सत्ताधारी आणि पालिकेचे वाभाडे काढणार

ठाणे पालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर एसीबीने कारवाई केली. बिल्डरकडून २५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना अटक केली. पोटोळे यांचे लोचखोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर पोटोळे यांचा आका कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -मनसे आक्रमक झाली असून येत्या सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सत्ताधारी आणि पालिकेचे वाभाडे काढले जणार आहे.
ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. दोन्ही पक्ष एकत्रित आपली ताकद दाखवणार आहे. ठाण्यातील वाहतूककोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकाम, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आदी प्रमुख मुद्दे या मोर्चातून मांडले जाणार आहेत. शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्र पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ठाणे पालिकेतील लाचखोरी – शंकर पाटोळे यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी
Comments are closed.