रेल्वे हद्दीतील नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करा! शिवसेनेची पालिका-रेल्वे प्रशासनाकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळा तोंडावर आला तरी पालिकेकडून नालेसफाईचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रेल्वे हद्दीतील नालेसफाईची पाहणी करण्यात आली. पावसाळय़ात मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे हद्दीतील नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करण्याच्या सूचना यावेळी पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱयांना देण्यात आल्या.

प्रभाग क्रमांक 54 मधील राम मंदिर येथील सिमेंट गोडाऊन व गोरेगाव रेल्वे स्थानकालगतच्या नालेसफाईची पाहणी  नगरसेवक अंकित प्रभू यांच्या पुढाकाराने करण्यात आली. या पाहणी दौऱयात शिवसेना खासदार व रेल्वे समिती सदस्य संजय दिना पाटील यांनी कामाचा आढावा घेतला. ‘रेल्वे हद्दीतील नाल्यांमधील गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, तसेच नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी,’ अशा सूचना संजय दिना पाटील यांनी यावेळी अधिकाऱयांना दिल्या. यावेळी रेल्वेचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.