गणेशभक्तांना शिवसेनेची खास भेट,विलेपार्लेत घरोघरी पूजा साहित्याचे वाटप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून बाप्पांच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. घरोघरी लगबग पाहायला मिळत आहे. यात शिवसेनेने गणेशभक्तांना खास भेट दिली आहे. विलेपार्ले मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने घरोघरी गणेश पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्या वतीने या श्रींच्या पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते, आमदार, विभागप्रमुख ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक संदीप नाईक, महिला विधानसभा संघटक रूपाली शिंदे, महिला विभाग संघटक शुभदा पाटकर, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, आनंद पाठक, नितेश गुरव, अथर्व मुरमुरे, राम जाधव उपस्थित होते.

■ गेल्या १९ वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम सुरू आहे. लाल वस्त्र, कापूर, अत्तर, धूप, हळद, कुंकू, वस्त्रे, गोमूत्र अशा पूजाउपयोगी २१ वस्तूंचे किट यात दिले जात आहे.

Comments are closed.