नवी मुंबईतील खड्ड्यांचा शिवसेनेने केला पंचनामा, महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबईतील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यावर जाऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. खड्ड्यांमुळे नवी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन आणि पुष्पहार घालून प्रतिकात्मक सत्कारही शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला.

नवी मुंबई शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर सध्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या झालेल्या या दयनिय स्थितीचा निषेध करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. शिवसैनिकांनी खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यावर उतरून पालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात राज्य संघटक अवधेश शुक्ला, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मढवी, सुमित्रा कडू, महेश कोटीवाले, सुनील गव्हाणे, एकनाथ दुखंडे, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, शहर संघटक मंजू म्हात्रे, माजी नगरसेविका नंदा काटे आदी सहभागी झाले होते

Comments are closed.