औरंगजेबाची कबर आम्हाला नको, संजय शिरसाट यांनी स्पष्ट केली भूमिका, लादेनचं दिलं उदाहरण, विरोधकां
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या बादशाहा औरंगजेबाची कबर हटवून टाकावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन, निर्दर्शनं केली जात आहेत. विशेष म्हणजे या मागणीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून वेगवेगळ्या पक्षांनीही याबाबत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीदेखील औरंगजेबाच्या कबरीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली असून आम्हाला औरंगजेबाची कबर नको आहे, असं म्हणत आगे-आघे देखो होता है क्या? असा इशाराच देऊन टाकला आहे.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
औरंगजेबाची कबर आम्हाला नको आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. आम्हाला यामध्ये द्वेषाचं राजकारण नको आहे. औरंगजेबाची कबर पाहिल्यानंतर आम्हाला चीड येते. एखादा राजा येतो मंदिरं उद्ध्वस्त करतो, महिलांवर अत्याचार करतो. संभाजी राजांचा छळ करून मारतो. अशा औरंगजेबाच्या आठवणी आम्हाला कशाला पाहिजे? असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
अमेरिकेने लादेनची कबर का बांधली नाही?
तसेच औरंगजेबाबद्दल आपल्याला प्रेम कशाला असावं? अमेरिकेने दहशतवादी लादेनला मारलं, त्यानंतर त्याला समुद्रात टाकून दिलं. अमेरिकेने त्याची कबर का केली नाही? कसाबला मारलं त्यावेळी या ठिकाणच्या मुसलमानानेसुद्धा त्याला विरोधच केला होता. त्याच्या कबरीला जागा दिली का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
विरोधक मूर्कासारखी विधानं करत आहेत
औरंगजेबाच्या कबरीवर बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. विरोधकांना अक्कल नावाची गोष्ट राहिलेली नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा असेल तर औरंगजेबाचा पुतळा शिवाजी महाराजांच्या बाजूला लावायचा का? औरंगजेबामुळे शिवाजी महाराज मोठे झाले असे सांगायचं आहे का? विरोधक मूर्खासारखी विधानं करत आहेत. त्यांचं औरंगजेबाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी ती कबर त्यांच्या घरात घेऊन जावी, असा पवित्रा संजय शिरसाट यांनी घेतला. तसेच आगे आगे देखो होता है क्या? असा इशाराही त्यांनी दिलाय.
https://www.youtube.com/watch?v=_xh0qhhv3je
हेही वाचा :
Sanjay Raut PC | औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारची सुरक्षा, मग नाटकं कशाकरता, राऊतांची भाजपवर टीका
औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा, मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी, एकबोटेंनी दिलं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Comments are closed.