गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मागाठाणे शाखा क्र. 12 तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर व आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते वैद्यकीय पदवी प्राप्त करणाऱ्या अदिती दीपक भातुसेसह विभागातील दहावी–बारावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ३६९ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अंकित सुनील प्रभू, धर्मेंद्र काळे, अशोक म्हामुणकर, श्वेता बोऱ्हाडे, राजू मुल्ला, मिलिंद साटम, तुकाराम पालव, तानाजी शेलार, सुप्रिया बोवलेकर, वैभवी तावडे, सारिका झोरे, सचिन मोरे, माधुरी खानविलकर, योगेश देसाई, इतिश्री महाडिक उपस्थित होते.
Comments are closed.