कराडमध्ये भाजपला हरवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र


सातारा कराड : कराड नगरपालिका निवडणुकीत (Karad Nagarpalika elections) भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे.  आहे. एवढेच  नाही तर भाजपला या निवडणुकीत हरवण्यासाठी   शिवसेना शिंदे गटानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाशी हातमिळवणी देखील केली आहे. त्यामुळं कराड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

कराड नगरपालिकेच्या 31 जागांसाठी 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कराड नगरपालिकेच्या 31 जागांसाठी 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह  9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील दोन मित्र पक्ष भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचा विरोधात उभे ठाकले आहेत. एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आपली ताकद लावतायत तर त्याचा विरोधात दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई शरद पवार गटाचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी हे यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवत आहे. भाजप वर टीका टाळत कराडच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे मंत्री शंभूराज देसाई सांगत आहेत.

भाजपच्या विरोधात सगळे एक होतायत म्हणजेच आमच्या चांगल्या कामाला दुजोरा मिळतोय

दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी देखील मतदारांच्या घरी जाऊन भेटी गाठी सुरू केल्या आहेत. भाजपच्या विरोधात सगळे एक होतायत म्हणजेच आमच्या चांगल्या कामाला दुजोरा मिळतो आहे आणि भाजप कराड मध्ये पक्षाच्या चिन्हावर लढत आहे. पण इतर पक्ष हे पक्ष चिन्हावर न लढता आघाड्या करून लढत असल्याची टीका अतुल भोसले यांनी केली आहे. कराड पालिका निवडणुकीत काँग्रेस देखील नगराध्यक्ष आणि 15 जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना कराड मध्ये होत असल्याने नेमका निकाल काय लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाला कोणत्या पक्षाकडून संधी?

कराडमध्ये भाजपनं विनायक पावसकर, काँग्रेसनं झाकिर पठाण यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव थेट नगराध्यपदाच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी रणजित पाटील देखील रिंगणात आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा

आणखी वाचा

Comments are closed.