Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut Slams PM Narendra Modi On Maharashtra Assembly Election 2025


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार झाला, मतदार कसे वा़ढले, याबद्दल खासदारांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. (Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut Slams PM Narendra Modi On Maharashtra Assembly Election 2025)

काय म्हणाले राऊत?

“राहुल गांधी यांनी महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगासमोर मांडले आहेत. या देशातील निवडणूक आयोग जिवंत असेल तर, त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी. पण निवडणूक राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तर देणार नाही. कारण निवडणूक आयोग देशातील केंद्र सरकारची गुलामी करत आहे. आम्ही सातत्याने राज्य आणि केंद्रातील निवडणूक आयोगासमोर आमचं डोकं आपटलं”, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली.

“राहुल गांधी यांनी नुकताच सांगितल्यानुसार, 39 लाख मतदार जास्तीचे दिसत आहेत. पण हे मतदार आले कुठून? महत्त्वाचं म्हणजे आता हे मतदार जाणार कुठे तर बिहारमध्ये हे मतदार जाणार. मतदान ज्यांनी केलं त्यांची नाव तिच राहणार, त्यांच्याकडे असलेली आधारकार्ड तशीच राहणार. आता हे मतदार बिहारमध्ये जातील. बिहारमधून उत्तरप्रदेशात जातील. हा एक नवा पॅटर्न भाजप वापरते. या नव्या पॅटर्नचा वापर करून भाजप निवडणूक लढवते आणि जिंकते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उपस्थित केलेल प्रश्न देशासाठी महत्त्वाचे आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“देशातील लोकशाही, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा हे सगळं जर जिवंत ठेवायचं असेल तर, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर दिलं पाहिजेत. माझं निवडणूक आयोगाला आवाहन आहे. तुम्ही या प्रश्नांची उत्तर द्यावीत. या सरकारनी तुमच्यावर टाकलेला पडदा काढा आणि या प्रश्नांची उत्तर द्या”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Shiv Sena UBT MP : आमची वज्रमुठ आहे, टायगर जिंदा है; ठाकरेंच्या खासदारांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर



Source link

Comments are closed.