सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी असंवेदनशील मंत्री, आमदारांना तात्काळ निलंबित करा; शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, यामागणीसाठी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती या पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली.

राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्रातून अवगत करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, आमदार अनंत नर व महेश सावंत, मनोज जामसुतकर, आमदार मिलिंद नार्वेकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमाताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, शिवसेना उपनेत्या विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, जो.ग. अभ्यंकर, नितीन देशमुख उपस्थित होते.

Comments are closed.