संकटात धावून येतो, तोच शिवसैनिक; मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी राजन विचारे यांनी दिला मदतीचा हात

नुकतेच मराठवाड्यात झालेल्या भीषण पावसामुळे मराठवाडा कोलमडला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाले. केवळ पीकच नाही तर, जमिनच खरडून वाहून गेली. त्यामुळे मराठवाडा अतिवृष्टीच्या सावटाखाली आहे. पुरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने इथला शेतकरी आता हताश आणि निराशेच्या गर्तेत आहे. यातच पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे सरसावली आहे. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा मतदारसंघातून सर्व जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख तसेच सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पाठवली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक पाठवण्यात आली आहे.
याचबद्दल बोलताना राजन विचारे म्हणाले आहेत की, “संकटाला धावून येतो, तोच शिवसैनिक. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर जेही संकट आलं असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल, अशावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीच शिवसैनिकांना सांगत असतात की, अशावेळी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. ही मदत नाही तर कर्तव्य म्हणून ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदरमधील शिवसैनिकांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक मदत म्हणून पाठवेल आहेत.”
Comments are closed.