भायखळ्यात शिवसेनेचा मेळावा
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथे शिवसेनेचा दणदणीत निर्धार मेळावा पार पडला. पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. पदाधिकाऱयांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीचे वाचन करावे, पोलिंग एजंटने मतदारांशी संपका&त रहावे असे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी मतदार याद्यांबाबत तांत्रिक माहिती दिली. मतदार यादीचे वाचन करून दुबार, बोगस, मृत, वास्तव्यास नसलेले मतदार शोधून काढून निवडणूक अधिकाऱयाकडे लेखी हरकत नोंदवण्याचे आवाहन केले. उपनेते, आमदार मनोज जामसुतकर यांनी भायखळय़ातील सहा प्रभागांतील सर्व नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यासाठी उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विधानसभा समन्वयक बबन गावकर, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उपविभागप्रमुख राम सावंत यांनी केले. या मेळाव्यास विधानसभा प्रमुख सुरेखा राऊत, संघटक मंगेश बनसोड, चंदना साळुंके, विजय कामतेकर, सोनम जामसुतकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, रवी चव्हाण, सूर्यकांत पाटील, उषा पाटोळे, विजया वाळुंज, शिल्पा जाधव, प्रभाकर पवार, उमेश नाईक, देविदास माडये आदी मान्यवर उपस्थित होते. निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख काका चव्हाण, रमेश रावल, निंगाप्पा चलवादी, सुहास भोसले, सलीम शेख, विनोद शिर्पे व महिला शाखा संघटक प्रियांका टेमकर, अंजना औटी, संगीता कोरे, संध्या तळेकर, शीतल थोरात, सोनल सायगावकर यांनी प्रयत्न केले.
Comments are closed.