कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल

कोकणातील जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला आहे. या वणव्यांमुळे कोकणातील समृद्ध जैवविविधता, पशु-पक्षी आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येवर उपाययोजना म्हणून वणवे लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासण्याची मागणी त्यांनी केली. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी आणि गैर-सरकारी संस्था (एनजीओ) यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. त्यामुळे तिथले पशु-पक्षी, जैवविविधता नष्ट होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करता येईल का? वणवे लावणे थांबलं तर जैवविविधता वाचेल. याविषयी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंड आणि एनजीओच्या माध्यमातून प्रयत्न करणार का?”

Comments are closed.