…तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊत यांचा इशारा
आपला जन्म अलिबागचा आणि कर्मभूमीही तीच असल्याने अलिबागबाबत आपल्याला जास्त माहिती आहे. अलिबाग प्रकरण बाहेर आले तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच अलिबागमध्ये गुजराती माणसासाठी दलाली कोण करत होते? अलिबाग गुजराती लॉबीकडे देण्याची सुत्रं कोण हलवत आहेत? असे सवालही त्यांनी केले आहेत.
आपला जन्म अलिबागचा आणि कर्मही तेथीलच आहे. आपल्याला त्या भागातील जास्त माहिती आहे. याबाबत अधिक माहिती बाहेर आली, तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल. त्याप्रकरणाची आपल्याकडे सगळी माहिती आहे. क्वालिटी काऊसिंल इंडियाचे चेअरमन जक्षय शहा हे गुजरातचे असून त्यांनी अलीकडच्या काळात अलीबागमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. त्याची दलाली कोण करत होते, अलीबाग गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्यासाठी कोणी सूत्र हलवत आहे, याबाबत आपल्याला जास्त बोलायला लावू नका, असा इशाराही राऊत यांनी दिला.
जक्षय शहा हे नाव आपण स्पष्टपणे घेतले आहे. हे अमित शहा आणि जय शहा यांचा हा खास माणूस आहे. त्या व्हिडीओत काय झाले ते स्पष्टपणे दिसत आहे. ते काय भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडीओ थोडा कट झाला आहे. त्या महिलेची पहिली कानफटात कोणाच्या पडली आहे? आणि त्यानंतर जी पळापळ झाली, ते दिसत आहे. त्यांच्यासमोर सरकारी अधिकाऱ्याला मारहाण होत असताना ते पळून का जात आहे? असा सवालही त्यांनी केला. एका जमीन मोजणी अधिकाऱ्यावर शेतकरी कुटंब हल्ला का करत आहे? तसेच त्यांच्याशी शेतकरी कुटुंबाचा बोलण्याचा टोन काय आहे, नीट समजून घ्या. हे सर्व बाहेर आले तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल.
सर्व मुंबई खोदून ठेवली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी ही सर्व कामे काढली आहेत. हे सर्व कंत्राटदार बाहेरचे आहेत. त्यांना मुंबईची काही माहिती नाही. त्या कामांमुळे बळी घेत देवेंद्र फडणवीस विकासाची भाषा करत आहेत. काल झालेल्या अपघातात बळी गेलेले उत्तर प्रदेशातील भाजपचे कार्यकर्ते आहेत, रामभक्त कार्यकर्त्यांचा बळी घेत भाजप विकासाचा गप्पा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Comments are closed.