शिवसेनेच्या नमिता श्रीखंडे यांची भाजपला धोबीपछाड; कर्जतच्या उमरोली पंचायत समितीत विजयाचा झेंडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कर्जत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कर्जत तालुक्यात जोरदार कामगिरी केली आहे. शिवसेनेच्या नमिता श्रीखंडे यांनी भाजपला धोबीपछाड देत उमरोली पंचायत समिती गणात विजयाचा झेंडा फडकवला. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी विजयी उमेदवार नमिता श्रीखंडे यांचे अभिनंदन केले.

माणगाव तर्फे वरेंडी जिल्हा परिषदअंतर्गत उमरोली पंचायत गणातील लढत विशेष चर्चेची ठरली. शिवसेना, भाजप, मनसे अशी लढत झाली. तिरंगी लढतीत शिवसेनेच्या नमिता श्रीखंडे यांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारत दणदणीत विजय संपादन केला.

श्रीखंडे यांना तब्बल ५५१९ मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा २७४९ मतांनी पराभव केला. भाजपच्या सुप्रिया भगत यांना केवळ २६७२ तर मनसेच्या प्रियंका पाटील यांना २७७० मते मिळाली. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे आणि मतदारांच्या विश्वासामुळे शिवसेनेची मशाल तेजाने उजळली.

नगर परिषदेपाठोपाठ झेडपीतही थोरवेंना कर्जतकरांनी झिडकारले; जिल्हा परिषदेत भोपळा, पंचायत समितीत दोन जागा

प्रत्येक फेरीत मशाल आघाडीवर

शिवसेनेने कर्जत तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती अशा चार जागा जिंकत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. उमरोली पंचायत समिती गणात मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत मशालीने आघाडी घेत विजय मिळवला.

Comments are closed.