मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का, संजय लाखे पाटलांचा राजीनामा, उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर आरोप
जलना: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने मोठे धक्के बसत आहेत. पक्षाचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील (Dr. Sanjay Lakhe Patil) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचं (Loksabha) तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप लाखे पाटील यांनी केला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जयंत पाटलांशी (Jayant Patil) विशिष्ट समझोता करुन सांगली लोकसभेची जागा घेऊन पराभव पदरात पाडून घेतल्याचा आरोपही लाखे पाटील यांनी केला.
अंबादास दानवे यांच्यावरही टीका
जालना (Jalna) लोकसभेची जागा आपल्याकडे येणार नाही याची काळजी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व पत्करलेले अंबादास दानवे यांनी घेतल्याचां आरोप देखील लाखे पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आमची संकल्पना असलेले कार्यक्रम चोरुन फुकट कौतुक घेत आल्याचा आरोपही लाखे पाटील यांनी केला.
संजय लाखे पाटील यांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय?
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे राज्य सचिव असलेले डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. लाखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला जालना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते त्यांनी पाळलं नाही. याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटलांशी विशिष्ट समझोता करुन सांगली लोकसभेची जागा घेऊन पराभव पदरात पाडून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
अंबादास दानवे फुकट कौतुक पदरात पाडून घेतायेत
दरम्यान रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिंकता येणारी जालना लोकसभेची जागा आपल्याकडे येणार नाही याची काळजी घेतल्याचे लाखे पाटील म्हणाले. याशिवाय सध्या मराठवाड्यात अंबादास दानवे यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची मूळ संकल्पनाही आपली होती. मात्र, हाच चोरलेला कार्यक्रम घेऊन अंबादास दानवे फुकट कौतुक पदरात पाडून घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray : हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, ठाकरे ब्रँड संपवू पाहणाऱ्यांचा नामोनिशाण मिटवू; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
आणखी वाचा
Comments are closed.