शिवसेनेचा दणका, पीव्हीआर चित्रपटगृहातील हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे सर्व लाईव्ह शो रद्द
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दणक्यानंतर पीव्हीआर सिनेमाने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे सर्व शो रद्द केले आहेत. शिवसेनेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान संघात खेळला जाणार होता. या लढतीचे थेट प्रक्षेपण पीव्हीआर सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर करण्यात येणार होते. पहलगाम आतंकवादी हल्ल्यात ज्या पाकिस्तानचा संबंध आहे त्याच पाकिस्तानसोबत होणारे क्रिकेट सामने हे भारतीय जनतेच्या भावनांशी केलेला खेळ आहे, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा सामना पीव्हीआरमध्ये दाखवण्यास कडाडून विरोध केला होता.
हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही हा मुद्दा रेटून धरला होता. तसेच शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी पीव्हीआर व्यावस्थापनाशी याबाबत याबाबत चर्चा केली होती. शिवसेनेच्या या दणक्यानंतर पीव्हीआर चित्रपटगृहातील हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत.
पहलगाम आतंकवादी हल्ल्यात ज्या पाकिस्तानचा संबंध आहे त्याच पाकिस्तानसोबत होणारे क्रिकेट सामने हे भारतीय जनतेच्या भावनांशी केलेला खेळ आहे. शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे ह्यांनी ‘पीव्हीआर’ व्यवस्थापनाशी ह्याबाबत चर्चा केल्यानंतर पीव्हीआर चित्रपटगृहातील भारत-पाकिस्तान क्रिकेट… https://t.co/fpx9kxc4k1
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) 28 सप्टेंबर, 2025
संजय राऊत यांचे ट्विट
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले होते. तसेच एक्स अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर करत हा नीचपणाचा कळस असल्याचे म्हटले होते. PVR मधील “पी” म्हणजे पाकिस्तान आहे काय? हे पीव्हीआर वाले भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत. यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्लज्जपणा येतो कुठून? सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली, आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्यांना अटक करा. फडणवीस आहे एवढी हिम्मत? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. तसेच भारत-पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पाहणे हा पहलगाम मधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देश द्रोह आहे! क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही! पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे! असेही राऊत यांनी ठणकावले होते.
हा तर नीच पणाचा कळस:
PVR मधील” पी “ म्हणजे पाकिस्तान आहे काय?
हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत.
ह्यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून?
सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक… pic.twitter.com/gy7343t8uk– संजय राऊत (@राउत्सनजे 61) 28 सप्टेंबर, 2025
Comments are closed.