पाकिस्तानसोबत खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक अन् जनता काळं फासणार, ठाकरेंच्या आमदाराचं

भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यावरील नितीन देशमुख: आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (India-Pakistan Match) आज (14 सप्टेंबर) दुबईत खेळवला जाणार आहे. मात्र, देशभरात या सामन्याला विरोधाची लाट उसळली असून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या सामन्यावरून वातावरण तापलेलं आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) या सामन्याला तीव्र विरोध करत असून, आज राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आजचा भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक आणि जनता काळे फासणार असल्याचं वक्तव्य आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. ते अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात ठाकरे गटाच्या महिला आघाडीनं घेतलेल्या आंदोलनावेळी माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचं आंदोलन

‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषवाक्याखाली राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिला कार्यकर्त्यांनी कुंकू आणि बांगड्यांचे पाकिट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठवणार आहे. या आंदोलनावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भारत पाकिस्तानच्या सामन्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या 26 लोकांच्या बायकांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला. मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है. ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती नाही का? मॅच खेळले नसते तर जय शहा फासावर लटकवणार होते का? असे म्हणत संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेटपटूंवरही निशाणा साधला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Jyoti Waghmare On Sanjay Raut: हिंमत असेल तर दुबईत जाऊन पीच उखडून दाखवा; ज्योती वाघमारे कडाडल्या, ठाकरेंना काय काय म्हणाल्या?

आणखी वाचा

Comments are closed.