पालघरमधील आगामी सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढवणार; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विनायक राऊत यांचे मार्गदर्शन

कोणती ही आव्हाने आली तरी त्याला तोंड देण्यास शिवसेना समर्थ पालघार जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. महापालिका, नगर परिषद, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला मार्गदर्शन करताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज आहे. कुणी कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मशालीची घोडदौड होतच राहील. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते उत्तम पिंपळे, उपनेत्या ज्योती ठाकरे, पालघर जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, अजय ठाकूर, अनुप पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील, विवेक पाटील, सहसंपर्कप्रमुख गिरीश राऊत, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, भाविका पाटील, लोकसभा समन्वयक भावना किणी, युवासेना जिल्हा युवाधिकारी सिद्धेश जोगळे, भक्ती दांडेकर आदी उपस्थित होते.
बोगस मतदारांची यादी आयोगाला पाठवा
शिवसेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांनी पालघर जिल्हा परिषद, वसई-विरार महापालिका, वाडा नगर परिषद, डहाणू नगर परिषद तसेच पालघर नगरपालिका क्षेत्राचा आढावा घेतला. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी होत असून दुबार तसेच बोगस मतदार शोधून त्याची यादी निवडणूक आयोगाला द्यावी, अशी सूचनाही विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना केली.
Comments are closed.