दिवाळीची पहिली आंघोळ महापालिकेच्या गेटसमोर, शिवसेनेचा पी दक्षिण कार्यालयावर बादली मोर्चा

अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर शिवसेनेतर्फे सोमवारी पी दक्षिण विभाग पालिका कार्यालयावर बादली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीची पहिली आंघोळ महानगरपालिकेच्या गेटसमोर करून आंदोलकांनी ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘आमच्या मागण्या पूर्ण करा,’ असा नारा देत तीव्र निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने शाखाप्रमुख संदीप गाढवे यांच्या नेतृत्वाखाली पी दक्षिण सहाय्यक आयुक्त कार्यालयावर बादली मोर्चा काढण्यात आला. या वेळी शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त पाटणे यांची भेट घेतली.

या आंदोलनात सुगंधा शेट्टी, दीपक परब, निलाक्षी भाबळ, विनायक ताटे, स्वाती शिर्के, सचिन सावंत, सुभाष जाधव, शिवा, गणेश घडशी, विजय मांजलकर, कुबेर लाड, कुप्पास्वामी, शांताराम सावंत, काशीनाथ गोलतकर, वीरेंद्र सोनावने, समीर गुरव, वर्षा पवार, संध्या भेंडे, रूपाली सकपाळ, उमा कोळी, शिला पाटील, हिरा शृंगारे, विजय शर्मा, ललित पांडे, हरीश कांबळे, यळूमलाई, मधुकर दळवी, विलास घोलप, संकेत लाड, पार्थ ढगे, सचिन दळवी, योगेश कानडिया, राजू खान, वैभव कांबळे, अयाज खान, प्रवीण कुमार, राजू पगारे, समीर खान, अनिल विटकर, प्रदीप यादव उपस्थित होते.

शिष्टमंडळाच्या मागण्या

  • बंगाली कंपाऊंडमधील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा.
  • पाणी सोडण्याच्या वेळेत केलेली कपात रद्द करावी.
  • कन्यापाडा परिसरात नळजोडणीसाठी दलालांमार्फत मागण्यात येणाऱ्या पैशांची चौकशी करावी.
  • प्रभागातील विकासकांना पाणीपुरवठा कसा होत आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी.
  • आरे कॉलनीतील युनिट-32मधील पंप सुरू करून 31 व 32मधील नागरिकांना त्या टाकीवरून पाणी सुरू करण्यात यावे.
  • युनिट-7मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाय करा.
  • साईबाबा कॉम्प्लेक्समधील साई सदन इमारतीमध्ये झालेल्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.

Comments are closed.