पावसाची ओढ अन् सरकारचे दुर्लक्ष; यवतमाळमध्ये शिवसेनेचा ZP कार्यालयावर आक्रोश मोर्चा, कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेल्या ओढीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

Comments are closed.