अरविंद सावंत बदनामी प्रकरणात शिव विधी व न्याय सेनेकडून ‘मिरर’ला नोटीस
शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्याबद्दल खोटे आणि बदनामीकारक वृत्त छापल्याबद्दल शिवसेनाप्रणीत शिव विधी व न्याय सेनेच्या वतीनं ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात 10 एप्रिल रोजी छापण्यात आलेल्या बातमीमध्ये पान क्रमांक 1 व 6 वर Another Political Storm Brewing in State. Shinde takes a Swing at UBT” राज्यात आणखी एक राजकीय वादळ घोंघावत आहे. शिंदे यांनी यूबीटीवर निशाणा साधला’ अशा शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखात खासदार अरविंद सावंत यांच्या नावाचा, फोटोचा व माहितीचा वापर करून सामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. यामुळे खासदार सावंत यांची बदनामी केल्याप्रकरणी शिव विधी व न्याय सेना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे व उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे यांनी ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसीमार्फत ‘मिरर’ने सार्वजनिकरीत्या माफी मागावी; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
Comments are closed.