ठाण्यात घुमणार शिवगर्जना, शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मनोरमानगर शाखा आणि शिवसंकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 6 मार्च रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवगर्जना घुमणार आहे. या सोहळ्यानिमित्त शिवअभिषेक, शिवमानवंदना, सत्कार, ढोलताशे, आख्यान असे विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ठाणे पश्चिम येथील मनोरमानगरच्या शनी मंदिर चौक परिसरात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजता शिवअभिषेक, सकाळी 10 वाजता शिवमानवंदना देण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 6.30 वाजता मान्यवरांचा सत्कार, जाणता राजा ढोलताशा पथकाची मानवंदना हा कार्यक्रम होईल. सायंकाळी 8 ते रात्री 10 वाजता फोक युवा आख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, खासदार संजय पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे, नगरसेविका राजुल पाटील, नगरसेवक शहाजी खुस्पे, माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर, उपशहरप्रमुख संतोष शिर्के, विभागप्रमुख चंद्रकांत केसरे, प्रदीप पुर्णेकर, शाखाप्रमुख सागर ढवळे, अनंत जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.