महाराष्ट्र वितरक सेनेचा वर्धापन दिन उत्साहात

शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वितरक सेनेचा 12 वा वर्धापन दिन दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना उपनेते आणि अंगीकृत संघटनेचे समन्वयक भाऊ कोरगावकर व माजी आमदार प्रकाश फातर्पेकर उपस्थित होते.

महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष दिलीप बाम्हणे यांनी वितरक सेनेच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील उपक्रमाची माहिती विशद केली. वितरक सभासदांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या झेंडय़ाखाली एकजुटीने उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी अष्टविनायक विघ्न क्रिएशन निर्मित ‘वजनदार’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत पवार यांनी केले. या वेळी सरचिटणीस अरविंद नाईक, खजिनदार महेश शिराळी, उपसचिव प्रवीण महाले, सल्लागार योगेंद्र ठाकूर, कार्याध्यक्ष सचिन झिनगरे, सचिव संतोष देवरुखकर, राजीव नाईक, सुनील सावंत, दिलीप दळवी आणि अभिनेत्री अक्षया नाईक आदी उपस्थित होत्या.

Comments are closed.