शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असं वाटतं : चंद्रकांत पाटील
Shivsena MLA Chandrakant Patil : भूसंपादना बाबत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही,असं वाटत असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय. ते जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ होत असल्याचा दावा आमदार चंद्रकांत पाटलांनी केला असून यामध्ये आपणही बाधित शेतकरी ठरलो असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास 13 फेब्रुवारी रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत आमदार चंद्रकांत पाटलांनी प्रशासनासह अप्रत्यक्ष सरकारला इशारा दिला आहे. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणी देखील आमदार चंद्रकांत पाटलांनी सरकारकडे केली आहे..
भूसंपादनात आमदार चंद्रकांत पाटील यांची जमीनही दुसऱ्याच्या नावाने दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जमीन हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प दर दिला जात असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यास 13 फेब्रुवारी रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारकडे मागणी
इंदूर हैदराबाद महामार्गासाठी केल्या जात असलेल्या भूसंपादनात सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा गोंधळ होत असून आपल्या नावाने असलेली जमीन भूसंपादनात दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही आमदार चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच जमिनी हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेतू पुरस्सर केल्या जात असल्याचा संशय असल्याचं पाटील म्हणाले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास 13 फेब्रुवारी रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत आमदार चंद्रकांत पाटलांनी प्रशासनासह अप्रत्यक्ष सरकारला इशारा दिला आहे. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणी देखील आमदार चंद्रकांत पाटलांनी सरकारकडे केली आहे..
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.