विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर
<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमधील महायुती सरकारचं दुसरं विधिमंडळ अधिवेशन होत असून अद्यापही राज्यात विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही वर्णी लागली नाही. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, अद्यापही त्याबाबतच निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना दिलेल्या सूचनेनुसार आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा समोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजीही केली.
विधानभवनात आज सकाळी विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना सभागृहात विचारण्यात आला. त्यावर, आपल्या दालनात यावर चर्चा झाल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. तसेच, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्षांचे उत्तर महाविकास आघाडीतील आमदारांना रेकॉर्डवर मिळालं. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. तसेच, लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणीही आमदारांनी केली.
विरोधी पक्षनेतेपदावरुन घोषणाबाजी
महाविकास आघाडीचे आमदार सभागृहातून थेट बाहेर येऊन त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केलं. सरन्यायाधीशांचा सत्कार होत असताना सभागृह विरोधी पक्षाविना असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते पदावर आक्रमक होऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. एवढेच काय तर महायुतीतील आमदार एका मागे एक विधान भवनात प्रवेश करत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
मराठी शाळेत शिकूनही सरन्यायाधीश – दानवे
सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्या बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इथं दोन्ही सभागृहाचे गटनेते असे म्हटले पण दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणून मी एकटाच आहे. काल महाराष्ट्रावर कोणी तरी बोलले, मात्र त्यांना उत्तर कृतीतून देण्याची आवश्यकता आहे. आताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं की, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळे गवईसाहेब हे तख्त राखत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक आज सरन्यायाधीश म्हणून बसतो, हे खर आहे. प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यानंतरही सरन्यायाधीश पदावर जाता येतं याचे उदाहरण म्हणजे सरन्यायाधीश आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
हेही वाचा
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/politics/mira-hayander-the-the-theds- haus-Minister-parnaik-chlogans-jai-gujarat-50-khoke- ^ ek-Mns-1366666">Video : मंत्री प्रताप सरनाईकांसमोर 50 खोकेच्या घोषणा, प्रचंड विरोधानंतर मोर्चेकरांनी हुसकावून लावलं
Comments are closed.