एके रॉयल फायटरने भगवा चषक जिंकला

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्र. 152 आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेत एके रॉयल फायटर इलेव्हनने नूरसिक एक्सएल संघाचा पराभव करत बाजी मारली. चेंबूरच्या गांधी मैदानात झालेल्या स्पर्धेत चेंबूरचे आठ आणि महाराष्ट्रातील आठ असे एपंदर 16 संघ खेळले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी बेस्ट अध्यक्ष अनिल पाटणकर, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, माजी शाखाप्रमुख शशिकांत पेंढारकर, विधानसभा संघटक संजय नटे, महेंद्र नाकटे, माजी नगरसेविका नीलम डोळस, राजेंद्र पोळ, अरुण हुले, अशोक माहुलकर, विकास बाणे, प्रकाश धुरी, गणेश साळुंखे, शशिकांत राय आणि आयोजक शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

Comments are closed.